धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विद्यार्थिनीला शिवीगाळ करत धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादीची मुलगी ही शाळेत जात होती. यावेळी आवेश मुसा खाटिक याने मुलीस शिविगाळ केली व तू घरी सांगितले तर तुला मारुन टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.ना. मोती पवार हे करीत आहेत.