जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विजय उर्फ सोनू रामलाल अहिरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
रामानंद नगर पोलीस स्थानकात भाग ५ गुरन ३३०/२०२० भादवि कलम ४५७,४५४,३८० या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी नामे विजय उर्फ सोनू रामलाल अहिरे यास पोहेकॉ विजयसिंग पाटील,जितेंद्र पाटील, प्रितम पाटील, राहुल पाटील,नितीन बाविस्कर आशाच्या पथकाने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेला मालापैकी ८८०० रुपये किंमतीच्या साड्या व ड्रेस मटेरियल तसेच गुन्ह्यात वापरलेले लोखंडी कटावणी हत्यार हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाई करिता मुद्देमाल व रिपोर्ट सह रामानंद नगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.