जळगाव (वृत्तसंस्था) नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला वाळूमाफिया ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी (वय ३६, रा. कोळन्हावी ता. यावल) याच्यावर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले असून त्याला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
फैजपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहणारा रेकॉर्डवरील वाळू माफिया गुन्हेगार ज्ञानेश्वर नामदेव तायडे उर्फ नाना कोळी यांच्यावर पोलीस ठाण्यात वाळू कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. तस्करीसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आतापर्यंत वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महेश्वर रेड्डी यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार ज्ञानेश्वर तायडे याला एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याबाबतच्या आदेशाला मंजूरी दिली आहे. त्याला कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
कोल्हापूर कारागृहात केले स्थानबद्ध
फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक फौजदार योगेश मालविया, एलसीबीचे पोहेकॉ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख कालू, संदीप चव्हाण, ईश्वर पाटील, पोहेकॉ योगेश महाजन, समाधान पाटील, अनिल पाटील यांनी संशयिताला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.