TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी अभिनेता दीप सिद्धूला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज ७६ वा दिवस आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं दीप सिद्धू याला अटक केलीय.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान घडलेल्या लाल किल्ला हिंसाचार घटनेतील मुख्य आरोपी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याला अखेर अटक झालीय. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार होता. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना नियोजित मार्गावरून दुसऱ्या मार्गावर नेण्याचा तसंच शेतकऱ्यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा सिद्धू याच्यावर आरोप आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (३२ वर्ष), हरजीत सिंह (४८ वर्ष), धर्मेंद्र सिंह (५५ वर्ष) या लोकांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटलं होतं. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं होतं.

राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती. दीप सिद्धूचं नाव भाजपासोबतही जोडण्यात आलं होतं. त्याचबरोबर या हिंसाचारामागे भाजपा असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनी केला होता. वारंवार सिद्धूच्या अटकेची मागणी केली जात असताना अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं याबद्दलची माहिती दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत’ : अमोल मिटकरी

March 8, 2022

शामखेडे येथील युवकास विनयभंग प्रकरणी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ; इतर कलमातही 2 वर्षाची शिक्षा !

April 21, 2022

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 17, 2023

मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालकवी स्मारकाचे ई‌- भूमिपूजन !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group