TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सिनेअभिनेते सयाजी शिंदेंनी जळगावात ‘हिरवाई’ प्रकल्पाच्या प्रारंभाप्रसंगी केलं ‘हे’ आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in आरोग्य, जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं’मध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवा, असे आवाहन देवराई प्रकल्पप्रमुख व हिंदी, मराठी, कन्नड व तमीळ चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

जळगाव हे नावाप्रमाणेच पाण्याने आणि वनराईने बहरलेले शहर असल्याची शंभर टक्के खात्री आज मला येथे आल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत पटली. जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘मराठी प्रतिष्ठान’ने वृक्षलागवडीचा घेतलेला वसा कौतुकास्पदच आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अभिनव संकल्पनेद्वारे साजरा करण्याच्या उद्देशातून मी गेल्या १५ ऑगस्ट २०२१ ला राज्यभरात ‘झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं’ हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून आपण आपल्या १००१ वृक्ष लागवडीच्या ‘हिरवाई’ प्रकल्पासोबतच सुबोनिया केमिकल्स लि.चे सुबोध चौधरी यांनी वृक्षलागवडीसाठी आरक्षित केलेल्या २१ एकर जागेत देशी व स्थानिक जातीचेच १५०० वटवृक्ष उभारावेत. तसेच एक लाख बेलाची रोपे लावून त्यांची बँक तयार करावी. ही रोपे आपण पुढील स्वातंत्र्यदिनी विविध गावांना नक्की देऊ शकू. यातून सात पिढ्यांसाठी ऑक्सिजनची निर्मिती होईल. शासनाच्या माध्यमातूनही जिल्हास्तरावर देशी व स्थानिक जातीच्या रोपवाटिका तयार केल्या जाव्यात, यासंदर्भातही मी मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत सतत चर्चा करीत आहे, असे आवाहन देवराई प्रकल्पप्रमुख व हिंदी, मराठी, कन्नड व तमीळ चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहरुण तलाव परिसरात १००१ झाडे लावण्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. प्रख्यात कादंबरीकार रंगनाथ पठारे, ज्येष्ठ कवयित्री सुमती लांडे, कवी प्रकाश होळकर, महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्यासह मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, मराठी प्रतिष्ठानचे सचिव ‘वनश्री’ विजयकुमार वाणी सदस्य डॉ. धनंजय बेंद्रे, लक्ष्मीकांत सूद, सुबोनिया केमिकल्स लि.चे सुबोध चौधरी, आनंदराव मराठे, सदस्या निलोफर देशपांडे, संध्या वाणी, डॉ. सुनीती बेंद्रे, डॉ. सविता नंदनवार, सुमित्रा पाटील, योगिता पाटील, संदीप पाटील, संतोष क्षीरसागर, विजय पाठक तसेच वृक्ष संवर्धन समितीच्या आरती शिंपी, पल्लवी शिंपी, महेश शिंपी, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, आयकर विभागाचे उपायुक्त मकवाना, ‘लिग्रँड’चे कर्मचारी यांच्यासह जळगावातील वृक्षप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरूवातीला सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांचा ‘वनश्री’ विजयकुमार वाणी, रंगनाथ पठारे यांचा महापौर जयश्री सुनिल महाजन, सुमती लांडे यांचा निलोफर देशपांडे, प्रकाश होळकर यांचा अ‍ॅड.शुचिता हाडा व शंभू पाटील यांचा विजयकुमार वाणी यांनी रोपटे देऊन सत्कार केला. त्यानंतर महापौर जयश्री सुनिल महाजन, अ‍ॅड. जमील देशपांडे व विजयकुमार वाणी यांनी जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्यात ‘हिरवाई’ प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासंदर्भात करार झालेला आहे. या प्रकल्पामुळे जळगाव शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितपणे भर पडेल. या अंतर्गत करंज, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा, चिंच, अमलतास, बहावा, कदंब आदी विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. या १००१ झाडांसाठी संपूर्णपणे खड्डे खोदून रोपट्याला काटेरी कुंपण टाकण्याचे कामही नियोजनपूर्वक सुरू झालेले आहे. ‘मराठी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने साकारला जाणारा हा सहावा प्रकल्प असल्याचे सयाजी शिंदे यांना सांगितले.

सयाजी शिंदे, पठारे, सुमती लांडे, होळकर, महापौर जयश्री महाजन, शंभू पाटील यांनी यावेळी प्रत्येकी एका रोपाची लागवड केली. याचवेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांसमवेत हात जोडून ‘पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’चा घोष करून ‘आंब्याच्या नावानं चांगभलं’, ‘वडाच्या नावानं चांगभलं’ अशी प्रार्थनाही केली. त्यानंतर सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्यासमवेत उपस्थितांनी छायाचित्रे काढली.

‘मराठी प्रतिष्ठान’ उभारणार ‘श्री सयाजी शिंदे वृक्ष बँक’

दरम्यान, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे व सचिव ‘वनश्री’ विजयकुमार वाणी म्हणाले, की सुबोध चौधरी यांनी वृक्षलागवडीसाठी आरक्षित केलेल्या २१ एकर जागेत वटवृक्षांसह ‘बेलाच्या रोपांची श्री.सयाजी शिंदे वृक्ष बँक’ या नावाने आम्ही बँक साकारू. या कामाला उद्यापासूनच आम्ही सुरूवात करू. यातून तयार झालेली रोपे जळगाव जिल्ह्यातील विविध गावांत वाटप केली जातील, हे आम्ही आजच आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. यासाठी काही मदत लागली, तर आपण नक्कीच सहकार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करून सयाजी शिंदे यांना आश्वस्त केले. त्यावर शिंदे यांनीही तुम्ही फक्त हाक द्या, पाहिजे ती मदत पुरविण्यासाठी मी बांधील असल्याची ग्वाही उपस्थितांसमोर दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

NEET परीक्षा रद्द करा ; देवेंद्र मराठे यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

५० टक्क्यांच्या मर्यादेवर १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

August 6, 2021

विभक्त राहणाऱ्या पत्नीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले १० लाखांचे कर्ज

April 18, 2025

‘गोल्डन सिंगर’ बप्पी लाहिरी यांचं निधन

February 16, 2022

ईडीची मोठी कारवाई ; ३१५ कोटींच्या एकूण ७० मालमत्ता जप्त !

October 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group