TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार वाढीव निधी : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांनी मोटारसायकलवर जाऊन केली दोनगाव ते खेडी रस्त्याची पाहणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आपण राज्यमंत्री असतांना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यभरात या प्रकारातील रस्ते बनत आहेत. आतापर्यंत प्रति किलोमीटरला एक लाख रूपये इतकी तरतूद यासाठी होती. मात्र यापुढे जिल्हा नियोजनमधून हीच रक्कम आता तीन लाख रूपये प्रति किलोमीटर इतकी वाढविता येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी दरम्यान सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी चक्क मोटारसायकलवर स्वारी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तर या कामाला वेग देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. तर, स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच हा रस्ता होत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंद हा आपल्याला विकास करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना वेग आलेला आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून बर्‍याच ठिकाणी याची कामे प्रगतीपथावर आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी या शेत रस्त्याच्या कामाला देखील मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. आज दोनगाव येथे एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी थेट दुचाकीवरून सुरू असलेले ठिकाण गाठून या कामाची पाहणी केली. त्यांनी या कामाला वेग देण्याचे निर्देश देऊन उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेत पाणंद रस्त्याची योजना आता राज्यात अतिशय व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. सध्या यासाठी एक लाख रूपये प्रति किलोमीटर इतक्या निधीची यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वाढीव निधीची मागणी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याला मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आता शेत पाणंद रस्त्यांसाठी प्रति किलोमीटर तीन लाख रूपयांपर्यंतची तरतूद आता करता येणार आहे. यामुळे साहजीकच रस्त्यांचा दर्जा हा अतिशय चांगला होणार असून याचा थेट लाभ हा शेतकर्‍यांना होणार आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजवर दोनगाव ते खिर्डी हा शेतरस्ता तयार करण्यात आलेला नाही. आता या रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वाकडे येणार असून याचा परिसरातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत असून यातून आपल्याला त्यांच्यासाठी अजून नवनवीन सुविधा पुरविण्यासाठी व परिसराचा विकास करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, किशोर पाटील, सुरेश पाटील यांच्यासह दोन गावकरी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी आता MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद : बनावट पावत्यांद्वारे टोलटॅक्स वसुली प्रकरण ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

August 11, 2022

ब्रेकिंग न्यूज : गिरीश महाजन, रामेश्वर नाईक विरोधात कठोर कारवाई करु नये : मुंबई उच्च न्यायालय

December 18, 2020

तीन वर्षांच्या नातीचे आजोबाकडून लैंगिक शोषण ; नात रुग्णालयात, आजोबा कोठडीत !

October 30, 2024

‘ते’ पैसे राज्यपालांकडे पोहोचलेच नाहीत ; किरीट सोमय्या अडचणीत

April 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group