धरणगाव (प्रतिनिधी) ANM नर्सिंग कोर्स अर्थात ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफरी हा दोन वर्षांचा नर्सिंग डिप्लोमा प्रोग्राम आहे. प्रामुख्याने आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित या डिप्लोमा कोर्ससाठी धरणगावाच्या ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
एएनएम नर्सिंग डिप्लोमा नेमका काय आहे?
सहाय्यक नर्सिंग मिडवाइफरी हा प्रामुख्याने एक डिप्लोमा कोर्स आहे. जो मानवजातीच्या आरोग्याच्या अभ्यासावर केंद्रित आहे. याशिवाय, हा अभ्यासक्रम शिकत असताना, उमेदवारांना ऑपरेशन थिएटर, त्याचे कार्य, विविध उपकरणे आणि ते कसे हाताळायचे याबद्दल देखील शिकवले जाते. ANM अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा उद्देश उमेदवारांना समाजात मूलभूत आरोग्य सेवक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षित करणे आणि मुले, महिला आणि वृद्धांना उपचार प्रदान करणे हा आहे.
‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रवेश सुरु
शहरातील ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या कोर्सचा कालावधी २ वर्षाचा असून यासाठी किमान १२ वी पास पात्रता आहे. ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये मर्यादित ६० जागा असून फक्त मुलींकरिता प्रवेश आरक्षित आहेत. ‘अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग’ हे किकाभाई ट्रेड सेंटर पाण्या टाकीजवळ आहे. अनुभवी प्राध्यापक वर्ग, एस्सी / एसटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नर्सिंग कौन्सिलचे नियमानुसार सर्व सोयी उपलब्ध असल्याचे स्कूलतर्फे कळविण्यात आले असून अधिक माहितीसाठी मंगला भीमराव पवार (९०११४२३०३५ / ८०१०७४१७१२ ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.