धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर,हनुमान नगर, नेहरू नगर येथील रहिवासी अतिक्रमनाला सी.टी.सर्व्हे नंबर मिळवून देण्यासाठी अॅड. वसंतराव भोलाने व इतर सहकारी प्रयत्न करत आहेत. यानिमित्ताने त्यांचा आज भाजपतर्फे कार्यालयात सत्कार करण्यात आला.
अॅड. वसंतराव भोलाने यांनी अतिक्रमण धारकाकडून एक रुपया घेणार नाही असा प्रण घेऊन ते समाजसेवा करीत आहेत. शासकीय स्तरावर त्यांना लागणारी सर्व मदत मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब हे करीत आहेत. त्यांची निस्वार्थी सेवा बघता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार भाजप कार्यालयात 15 ऑगस्टचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे, शिरिष बयस, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, माजी गटनेते कैलास माळी सर,माजी नगरसेवक ललित येवले, माजी सैनिक शांताराम जाधव, कैलास लांबोळे, रामदास महाजन, विजय पाटील, हर्षल चव्हाण, जुलाल भोई,वासुदेव महाजन,आंनद वाजपेयी, सुनील चौधरी, कन्हैया रायपुरकर, सचिन पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.