TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर ‘त्यावेळी’ त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीबीआयचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी केला आहे. आर.के.राघवन यांचे “A Road Well Travelled” आत्मचरित्र प्रकाशित झाले असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.

“माझ्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांची बाजू घेण्यात आल्याचा आरोप झाला. माझ्या फोनवरील संभाषणांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. पण काहीही ठोस न मिळाल्याने त्यांची निराशा झाली,” असं राघवन यांनी पुस्तकात म्हटलं आहे. “२००२ गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदींची सलग नऊ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान नरेंद्र मोदींनी तपास अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या १०० पैकी एकही प्रश्न टाळला नाही. संपूर्ण चौकशीदरम्यान ते अत्यंत शांत होते. नऊ तासांच्या या चौकशीत त्यांनी साधा चहादेखील स्वीकारला नाही,” असा खुलासा राघवन यांनी केला आहे. “तपासासाठी नरेंद्र मोदींना गांधीनगरमधील एसआयटी कार्यालयात येण्याची तयारी दर्शवली तसंच सोबत पाण्याची बाटली आणली होती,” अशी माहिती दिली आहे.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना चौकशीसाठी बोलावण्यासंबंधी सांगताना त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी कार्यालयात यावं लागेल असं कळवलं होतं.इतर कोणत्या ठिकाणी ही चौकशी करणं चुकीचा संदेश देणारं ठरलं असतं. मोदींनी आमच्या निर्णयाचं महत्व समजलं आणि ते एसआयटी कार्यालयात येण्यास तयार झाले”. राघवन यांनी मोदी आणि आपल्यामध्ये काही ठरलं होतं असे आरोप होण्याची शक्यता असल्याने एसआयटी सदस्य अशोक मल्होत्रा यांना चौकशी करण्यास सांगितलं होतं. “जवळपास नऊ तास मोदींची चौकशी सुरु होती. संपूर्ण चौकशीदरम्यान नरेंद्र मोदी शांत होते. रात्री उशिरापर्यंत ही मॅरेथॉन चौकशी सुरु होती,” असं राघवन यांनी सांगितलं आहे.

“मोदींनी एकाही प्रश्नाचं उत्तर टाळलं नाही. तसंच उत्तर देताना ते दुर्लक्षितही केलं नाही. जेव्हा मल्होत्रा यांनी त्यांनी लंचसाठी ब्रेक हवा आहे का विचारलं, तेव्हा त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी आपली पाण्याची एक बाटली आणि होती, चहा घेण्यासाठीही त्यांनी नकार दिला,” अशी माहिती राघवन यांनी दिली आहे. राघवन यांनी मोदींच्या एनर्जीचं कौतुक केलं असून मोदींना थोड्या वेळासाठी विश्रांती घेण्यासाठी तयार करताना खूप प्रयत्न करावे लागले अशी माहिती दिली आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये एसटीआयकडून अंतिम अहवाल सादर करण्यात आल. यामध्ये मोदींसहित ६३ जणांना कोणताही पुरावा न सापडल्याने क्लीन चीट देण्यात आली. सुप्रीम कोर्टाकडून एसआयटीची स्थापना करत राघवन यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय राघवन सीबीआयच्या प्रमुखपदीही होते. याशिवाय बोफोर्स घोटाळा, २००० दक्षिण आफ्रिका क्रिकेट मॅच फिक्सिंग, चारा घोटाळा यासारख्या अनेक मोठ्या प्रकऱणांचा तपास राघवन यांच्याकडून करण्यात आला आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सुनिल तटकरे कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ऊसतोड कामगारांची मुलं फडात नाही तर लवकरच शाळेत दिसतील; धनंजय मुंडे

November 11, 2020

कुलगुरूंनी राजीनामा देऊन पळ काढू नये ; विद्यापीठ विकास आघाडी !

February 27, 2021

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहताहेत” : अतुल भातखळकर

June 26, 2021

जमिनीवरून निर्माण झालेल्या तंट्याच्या प्रकरणात तब्बल १०८ वर्षांनी न्यायालयाचा निर्णय

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group