धरणगाव (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांकडून महायुतीत फुट पडणार असल्याच्या वल्गना केल्या जात होत्या. परंतु या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चीत करून नऊच्या नऊ जागा विजय झाल्यामुळे धरणगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून वाजत गाजत नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून जल्लोष करण्यात आला. या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील यांनी केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय महाजन, भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस प्रमिला रोकडे, माजी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक अहमद पठाण, नगरसेवक नंदकिशोर पाटील, नगरसेवक अजय चव्हाण, विनायक महाजन, शेतकरी सेना तालुकाप्रमुख, वि. का. सोसायटी संचालक रामकृष्ण महाजन, भाजप तालुका अध्यक्ष रेखा पाटील, शिवसेना शहर प्रमुख भारती चौधरी, उपप्रमुख सुनिता पाटील, शिवसेनेचे नेते धीरेंद्र पुर्भे, विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख विशाल महाजन, सोनु महाजन, बाळासाहेब जाधव, युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत सरपंच धनराज सोनवणे, बेघर झोपड वासियांचे नेते रवींद्र कंखरे, युवा सेनेचे तालुका संघटक कमलेश बोरसे, योगेश पाटील, पप्पू कंखरे, नाना धनगर, गोविंद धनगर, तालुका संघटक हेमंत चौधरी, अविनाश महाजन, शेखर माळी, तोसीफ पटेल, भैय्या चौधरी, आरिफ शाह, भाजपाच्या कुंजल भाटिया, समाधान पाटील, अनिकेत धनगर, परेश नाईक, फारुख पटेल, नगराज पाटील, रवींद्र जाधव, जिजाबराव देशमुख, कैलास इंगळे, समाधान धनगर, हेमू चौधरी, हर्षल धनगर, मयूर माळी, राहुल चव्हाण, अनुप चव्हाण, गोकुळ सैंदाणे, नाना माळी, देवकीनंदन माळी, देवा रोकडे, प्रवीण माळी, अमोल माळी, हरि चौधरी, दीपक पाटील, राजू महाजन महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















