जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमधील वायरल झालेल्या व्हिडीओनंतर आज महापौर सौ. जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली.
तसेच यावेळी गोलाणी मार्केटमधील सर्व शौचालय-बाथरूम यांची पाहणी केली असता गोलाणी मार्केट मधील सर्वच शौचालय-बाथरूम बंद असल्याचे महापौर-उपमहापौर यांच्या निदर्शनात आले आहे. याबाबत आज मनपा आरोग्य, अतिक्रमण अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरात लवकर मार्ग काढू असे सांगितले.