जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुध्दिबळ संघटना अर्थातच एआयसीएफने भारतातील बुध्दिबळ खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच व स्नेहीसाठी कोविड चेक मेट हे दालन उघडले असून त्याद्वारे ते कोविड-१९ रुग्णांना आर्थिक सहाय्य सोबत समुपदेशनाद्वारे बरे करण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे.
महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी यात सहभागी होऊन पुढाकार घेऊन सोळा लाख रुपयाची मदत सुध्दा एआयसीएफला केली असून डॉक्टरांचे पॅनल सुध्दा दिलेले आहे.
महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेद्वारे विभागवार कृती दलाचे सदस्य
★ सिद्धार्थ मयूर (पुणे) पूर्ण महाराष्ट्र राज्याचे मुख्य नोडल कॉर्डिनेटर,
★ निरंजन गोडबोले (पुणे) बुद्धिबळ संघटनेचे कॉर्डिनेटर
★ मनीष मारुलकर(कोल्हापूर)पश्चिम महाराष्ट्र
★ फारुक शेख (जळगाव) खान्देश
★ अंकुश रक्ताडे (बुलढाणा) विदर्भ
★ हेमेंद्र पटेल (औरंगाबाद) मराठवाडा
★ विलास म्हात्रे (रायगड) कोकण
★ निनाद पेडणेकर (पालघर) मुंबई
कृती दलाचे कार्य- डॉक्टर सल्ल्यानुसार शिफारस
बुध्दिबळ खेळाडूस वा संबंधितास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसेच शास्त्रीय तर्कसंगत, न्यायसंगत आधारावर शिफारस करेल. या महामारी संबंधिताची आर्थिक परिस्थिती त्याला असलेला आजाराचे गांभीर्य, आवश्यक औषधांची उपलब्धता, निश्चित करून उपाय सुचवेल. रुग्णांना तज्ञ डॉक्टरांची मदत व्हावी म्हणून तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे प्रशिक्षित डॉक्टर हे रुग्णांचे समुपदेश करतील. महामारी व्यवस्थापनासाठी आणि उपचारासाठी राज्यभर यासंबंधीचे जागरुकता वाढवण्यासाठी व दर्जेदार सेवा देण्यासाठी सहकार्य करणार आहे.
एआयसीएफद्वारे महाराष्ट्र राज्याने दोन बुध्दिबळपटू ना केले आर्थिक सहकार्य
नागपूर येथील उमेश पानबुडे हे कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना तातडीने अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेने एक लाख रुपयाची आर्थिक सहकार्य केले. तर दुसरे नागपूर येथील स्वप्निल बनसोड यांना सुद्धा आर्थिक सहकार्य केलेले आहे.
महाराष्ट्रातून सोळा लाखाचे एआयसीएफला अर्थसहाय्य
अखिल भारतीय बुध्दिबळ चेकमेट कोविडला महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन कंपनीचे चेअरमन अशोक जैन यांनी अकरा लाख रुपयाचे तर महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेने पाच लाख रुपयाचे आर्थिक उपलब्ध करून दिले आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील बुध्दिबळ
खेळाशी संबधीतास कोविडमूळे दवाखान्यात ऍडमिट होणेची वेळ आल्यास किंवा काही सहकार्य लागल्यास त्यांनी त्वरित खान्देश विभाग कृती दल प्रमुख फारूक शेख (९४२३१८५७८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले व ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.