TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एअरपोर्ट ऑथोरिटी तामिळनाडू संघ आघाडीवर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ प्रेसिडेंट कॉटेज येथे आजच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेची सुरुवात जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित यांचे हस्ते करण्यात आली.

यावेळी सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे, प्रवीण ठाकरे, शकील देशपांडे, चंद्रशेखर देशमुख, रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे. महिला गटात एकूण ११संघ तर पुरूष गटात २२ संघ सहभागी आहे.

READ ALSO

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

आजचे निकाल
दुसऱ्या फेरी अखेर महिला गटात एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चा संघ आघाडी वर अर्पिता मुखर्जी, दिव्या देशमुख प्रियांका नुटक्की व आर वैशाली सारख्या खेळाडूंसह खेळत असलेल्या या अग्रमानांकित संघाने दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या महिला अ संघाची कडवी लढत २.५- १.५ ने मोडीत काढत विजयी घौडदौड कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय मास्टर आर वैशाली ला आंतर राष्ट्रीय मानांकित खेळाडू विश्वा शाह हीस पराभूत करण्यासाठी चांगलाच घाम काढावा लागला. शंभराहून अधिक चाली झाल्यामुळे डाव चार तासाहून अधिक खेळला गेला पण वैशाली च्या स्पर्धात्मक अनुभवा पुढे विश्वाला हार मानावी लागली.
बाकी निकाल मात्र अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होते.

पेट्रोलियम स्पोर्ट्स च्या संघाने हिमाचल प्रदेश चा ४-० धुव्वा उडवला, तर आंध्र संघाने ३-१ गुण संख्येने गुजरात संघाचे आव्हान मोडीत काढले. राजस्थान व बिहार संघाने अनुक्रमे महाराष्ट्र क व ओडिसा संघाचा २.५-१.५ ने पराभव केला. पुरुष गटांमध्ये मात्र अव्वल स्थानासाठी कडवी झुंज चालू असून दुसऱ्या फेरी अखेर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ‘अ’ व ‘ब’ संघ, एल आय सी ऑफ इंडिया, तामिळनाडू ‘अ’ संघ ४ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

सकाळच्या दुसऱ्या फेरीत ग्रँड मास्टर अरविंद चिदंबरम याने कोले झुकरटोट‌ या अतिशय विस्मृतीत गेलेल्या ओपनिंग चा अवलंब करीत पटावरील काळ्या राजाला आपल्या मोहोऱ्यानी जेरीस आणले, अरविंद ने आपला घोडा पटाच्या मध्यभागी इ ५ घरावर ठेवत , वजिराला,दोन्ही हत्तींना काळ्याच्या भागात नेत अनिरुध्द ची बाजू खिळखिळी केली व डावावर वर्चस्व प्रस्थापित केले.

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशनच्या ग्रँड मास्टर विसाख ला मात्र राजस्थानच्या यश भराडिया कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व स्पर्धेतील पहिल्या वहिल्या खळबळजनक निकालाची नोंद केली. या राजस्थान च्या १७४९ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त नवोदित खेळाडूने पांढऱ्या सोंगत्यांनी खेळताना आक्रमक चाली रचत विसाख च्या सिसिलियन डिफेन्स ला निरुत्तर केले. विशाख ने आपल्या राजाला सुरक्षित स्थळी न हलविण्याची चूक त्याला महागात पडली, यश ने आपल्या सोंगट्याच्या विकासानंतर राजाला वजिराच्या बाजूला सुरक्षित केले आणि अंतिम हल्यासाठी सर्व सोंगट्याना योग्य जागी नियुक्त केले. आपल्या डी पट्टीवरील प्यादाला ड ६ घरात खेळत त्याने ग्रॅण्डमास्टर वर सुरवातीपासूनच वरचष्मा ठेवला. सरतेशेवटी घोड्याला अचूकपणे फिरवत काळ्या हत्तीवर व वजिरावर पकड घेतली व ग्रँड मास्टर ला अवघ्या ३९ चालितच हार पत्करणे भाग पाडले. पण रेल्वे च्या स्वप्नील, विघ्नेश व श्याम निखिल ने आपापले डाव जिंकल्याने रेल्वे ने राजस्थान चा १-३ असा पराभव केला.

स्पर्धेतील डाव मोठ्या टाइम कंट्रोल चे असले कारणाने खेळाडूंचा खरा कस अशा स्पर्धांमध्ये जोखला जातो. जगप्रसिध्द खेळाडूंचा सहभाग, देशातील मोजक्या पण महत्त्वपूर्ण स्पर्धांमधील एक स्पर्धा, सदर स्पर्धेसाठी नियुक्त केलेला आलिशान ए सी हॉल, स्पर्धे ठिकाणीच खाण्याची व राहण्याची सुंदर व्यवस्था आदी कारणाने स्पर्धा सुरू होण्या अगोदरच देशभरात पोहचली होती पण रसिक बुद्धिबळ प्रेमींना तुल्यबळ लढती पहावयास मिळत असल्याने प्रेसिडेंट कॉटेज या स्पर्धा स्थळी अनेक बुद्धिबळ प्रेमी खेळ पहावयास व दर्जात्मक लढतींचा आनंद घेण्यास येत आहेत.

दुसऱ्या फेरी अखेर काही महत्त्वाचे निकाल खालील प्रमाणे ( पुरुष गट)

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया विजयी वि (४-०) महाराष्ट्र अ संघ

राजस्थान अ संघ पराभूत वि (१-३)
रेल्वे प्रमोशन बोर्ड अ संघ

रेल्वे प्रमोशन बोर्ड ब संघ विजयी
केरळ राज्य संघ (४-०)

सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड पराभूत वि एल आय सी ऑफ इंडिया (१.५-३.५)

तामिनाडू अ संघ विजयी वि आंध्र प्रदेश ( ४-०)
शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा तिसऱ्या फेरी अखेर पुरुष गटात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व तामिळनाडू संघाने ६ गुणांसह निर्विवाद आघाडी घेतली असून रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड अ व ब संघ ५ गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत. पुरुष गटांतील अजून ६ फेऱ्या बाकी असून, महिला गटातील ४ फेऱ्या बाकी आहेत. उद्या दोन्ही गटांतील एक फेरी असून सकाळच्या सत्रात फेरी खेळविली जाईल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य, १० ते १६ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टीआरपी घोटाळा प्रकरण : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

December 13, 2020

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले ; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

June 1, 2021

निवडणुकीच्या भीतीमुळे व्याजदर कपातीचा निर्णय बदलला : दिग्विजय सिंह

April 1, 2021

शरीरसंबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; महिलेचे आर्थिक शोषण, वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

March 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group