नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज राजधानी दिल्लीतील रोहिणी कोर्टात आज गँगवॉर पाहायला मिळाला आहे. या गोळीबारात गँगस्टर गोगी ठार झाला आहे. रोहिणी कोर्ट नंबर २ मध्ये गोगीला हजर केलं असता वकिलांच्या वेषात आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. यानंतर पोलिसांनी शूटआऊट करत हल्ला करणाऱ्या दोघांना ठार केलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून हा एन्काऊंटर करण्यात आला.
जितेंद्र गोगी, एक कुख्यात गुंड होता आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणात तो दोषी आढळला होता. सध्या तो तिहार येथे तुरुंगात होता. त्याला न्यायालयात हजर केले जात असताना प्रतिस्पर्धी टोळीचे सदस्य वकीलांचे कपडे घालून कोर्टात दाखल झाले आणि गोळीबार केला. तसेच हल्ला करणारे विरोधी गटातील होते असं सांगितलं जात आहे. शूटआऊटमध्ये एकूण चौघे ठार झाले आहेत. दरम्यान, कोर्टाच्या आवारात कडक सुरक्षा आहे आणि प्रत्येकाची तपासणी गेटवरच केली जाते. हल्लेखोरांनी वकिलांची कपडे घातल्यामुळ ते सुरक्षा तपासणीतून सहज निसटले.
दिल्ली पोलीस गुंड जितेंद्र गोगीला संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी रोहिणी कोर्टात घेऊन आले होते. या दरम्यान वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या दोघांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दोघांना ठार केले. गोगीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र गोगी यांच्यावर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, जिथून त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते.