जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत चे अधिवेशन जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. सदर अधिवेशनात खान्देश रत्न ,आंतरराष्ट्रीय व जागतिक स्थरावर जळगाव सुवर्ण नगरीचे व जैन उद्योग समूह गांधी तीर्थ चे नाव जागतिक नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरनारे, तीर्थस्वरुप भवरलाल जैन यांचे सुसंस्कृत आचार विचार यांचा वारसा जपत सामान्य शेतक-यांच्या शेतशिवरात जैन इरिगेशन पाईप सिस्टम्स द्वारे माळरान फुलवणारे जैन उद्योग समूह चे अध्यक्ष अशोक जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करीत सन्मानित करण्यात आले होते.
सदरहू राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्काराचे वितरण कांताई अध्यक्षीय कार्यालयीन सभागृह जैन हिल्स अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य जळगाव व धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य डॉ.अनिल देशमुख, मध्य महाराष्ट्र प्रांत जागरण आयाम प्रमुख विजय मोहरीर, प्रांत महिला प्रमुख व जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्यस्थ पॅनल सदस्य धुळे ॲड.भारती अग्रवाल, जिल्हा महिला प्रांत प्रतिनिधी निर्मला देशमुख, जळगाव महानगर महिला संघटक श्रीमती विद्या राजपूत, महिला प्रतिनिधी प्रतिभा सूर्यवंशी जिल्हा संघटक भाई साहेब मकसुद बोहरी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य महेश कोठवदे , अमळनेर तालुका अध्यक्ष व महिला उद्योजक स्मिता चंद्रात्रे ,यावल तालुका अध्यक्ष बाळकृष्ण वाणी,पाचोरा तालुका श्री स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्राचे यादज्ञाकी सुभाष पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष संजय रतन पाटील, पाचोरा वकील संघाचे व ग्राहक पंचायत चे तालुका संघटक ॲड निलेश सूर्यवंशी, सदस्य उदय पवार आदी मान्यवरांचे उपस्थितीत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांचे हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार करून अष्टगंध तिलक श्री कृपा आशिर्वादाचे प्रसादाचे नारळ ,शाल,पुष्पगुच्छ व सन्मान स्मृती चिन्ह मानपत्र व सुवर्ण महोत्सवी ग्राहक बिंदू श्री क्षेत्र ओझर प्रकाशित स्मरणिका प्रदान करीत गौरवण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रांत महिला प्रमुख ॲड.भारती अग्रवाल यांनी केले तर आपले मनोगतात जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख यांनी, जैन उद्योग समूह व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नावाने उभारण्यात आलेले गांधी तीर्थ, म्युझियम, माझे जीवनच माझा संदेश आहे हे सांगणारा महात्मा गांधी यांचे भव्य शिल्परुपी पुतळा म्हणजे गांधी विचारांचे जागतिक स्थरावर दैदिपवान कीर्ती क्षेत्र विद्यापीठ असल्याचे विचार करीत अशोक जैन यांनी तिर्थसवरुप भवरलाल जैन यांचे वारसा जपत सामान्य शेतकरी यांच्या जीवनमानात परिवर्तन आणले. अशा कर्मविर अशोक जैन यांना राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार जाहीर करीत आज त्याचे वितरण होत असल्याबद्दल आनंद आहे. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे संस्थापक अध्यक्ष ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे व भवरलाल जैन यांच्यातील स्नेहपूर्ण ऋणानुबंध याचा उल्लेख करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेले 50 वर्षातील कार्याचा आढावा घेत जिल्ह्यातील विस्तारित प्रगती आलेखही सादर केला.
या प्रसंगी यावल तालुका अध्यक्ष बाळकृष्ण वाणी संपादित ज्येष्ठ नागरिक संघ दैनिक यावल समाचार अंकाचे ही प्रकाशन अशोक जैन यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
अशोक जैन यांनी आपले भावपूर्ण कृतज्ञाभाव व्यक्त करीत सातत्यपूर्ण कार्य करीत अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची प्रगती आलेख उंचावणारा असून ग्राहक तिर्थ बिंदुनाना माधव जोशी यांचे शोषण मुक्त समाज निर्मितीचे स्वप्न येणाऱ्या 50 वर्षात अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने पूर्णत्वास येऊन साकार करावे असे आवाहन केले आहे. तसेच श्री राम जन्म भूमी अयोध्या येथे श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली मोरे दादा यांचा सहवास लाभल्याचे उल्लेख करीत भूमिपुत्र रामलला विशेष अंक उपस्थितांना त्याचे स्वहस्ते सप्रेम भेट म्हणून दिलेत. या नंतर चे मुक्त चिंतनात जैन हिल्स गांधी तीर्थ बद्दल उल्लेख करीत ॲड.भारती अग्रवाल यांनी जगातील आठवा अजुबा असल्याचे तर निर्मला देशमुख यांनी महात्मा गांधी चे भव्य शिल्प पुतळा हा गुजरात मधील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य पुतळ्याची व परिसर याची आठवण करून देणारी असून हे आपल्या खान्देश चे वैभव गौरव स्थान असल्याचा भाव व्यक्त केला तर जिल्हा संघटक भाई मकसुद बोहरी यांनी पूज्य साने गुरुजींच्या सुंदर आठवणीचे समालोचन समावेश असलेले पुस्तक अशोक जैन यांना सप्रेम भेट देत गांधी विचारांचे आदर्श वास्तू निर्मिती करत समाजापुढे महात्मा गांधी यांचा आदर्श चिरकाल केल्या बद्दल चे विचार व्यक्त केलेत. प्रांत जागरण आयाम प्रमुख विजय मोहरीर यांनी दीपस्तंभ अशोक जैन यांची ही अविस्मरणीय अशी भेट असून अशोक जैन यांचे व त्यांचे स्विय सहाय्यक मनीष शाह यांचे प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केलेत जळगाव जिल्हा कार्यकारिणी यांचेही आभार मानले आहेत.