नंदुरबार/जळगाव (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातातील जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. त्यात सय्यद जोया सय्यद हरून (वय १८, जळगाव) कौसर बी खां (वय ७०, जळगाव) अफसाना सय्यद (वय ३२, जळगाव) अख्तर बी खान (वय ६०, जळगाव) रेखा समाधान पाटील (वय २६,जळगाव) भाग्यश्री समाधान पाटील (वय २४, जळगाव) जयेश भानुदास वाघोदे (वय २८,जळगाव) सय्यद हरून सय्यद समद (वय ३४, जळगाव) सय्यद रियाज सय्यद हरून (वय १५, जळगाव) अय्युब साडे खान (वय ५५, जळगाव) समाधान सचिन पाटील (वय २८, जळगाव) शांताराम किसन धनगर (वय ३८. रा. भादली) निलेश शांताराम धनगर (वय २२,रा. भादली) उषा शांताराम धनगर (वय ४०, रा. भादली) प्रिया समाधान पाटील (वय ९,जळगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे.