धरणगाव (प्रतिनिधी) दि. २१ डिसेंबर रोजी धरणगाव तालुक्यात शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक दुपारी ३:०० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न. पा. धरणगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याने सदर बैठकीस विशेष महत्व आहे. या बैठकीला जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील हे मार्गदर्शन करणार असून धरणगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, ग्रंथालय सेना, दिव्यांग सेना पदाधिकारी, प. स. सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका प्रमुख गजानन पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी केले आहे.