जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा गावातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सावखेडा गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आला आहे. रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (वय -३२, रा. सावखेडा ता. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील सावखेडा गावातून चार ते पाच महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ५०७६) चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना संशयित आरोपी हा सावखेडा गावातील असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भरत पाटील, ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (वय- ३२,रा. सावखेडा ता. जळगाव) याला मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सावखेडा गावातून अटक केली आहे. त्यांनी ट्रॅक्टर चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे. त्यासाठी पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.