यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सांगवी बुद्रुक-यावल रस्त्यावर 65 वर्षीय वृद्ध इसमाला दुचाकीने धडक दिल्याने वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथे यावल-फैजपूर रस्त्यावर वसंत नगराजवळ लतीफ अब्दुल शहा (65) हे पायी जात असताना त्यांना दुचाकी (क्रमांक एम.एच.12 बी.एस.8426) वरील चालक पंडित भास्कर धांडे (सांगवी बुद्रुक) याने जबर धडक दिली. या अपघातात शहा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अल्ताफ लतीफ शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंडित धांडे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.