सातारा (वृत्तसंस्था) तलावाच्या पाण्याचा अंदाज आल्याने पाण्यात बुडून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. साधू बाबू अडके (वय ५९ रा. तिरकवाडी ता. फलटण), असे मयताचे नाव आहे.
दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता साधू आडके आंघोळीसाठी येथील तलावावर गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आसपासच्या मुलांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाहीत. रविवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान केतन बाळू गोरगन यांना आडके हे तलावामध्ये एका ठिकाणी आढळून आले. त्यांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याबाबत मयूर आडके यांनी याबाबतची खबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.
















