जळगाव (प्रतिनिधी) सोशल मीडियावर ओळखी करीत अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगत त्याद्वारे विविध कंपन्यांचे मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२, रा. विलास चौक, कांचन नगर) यांनी शेअर्स खरेदी केली. तसेच त्यांना अधिक नफा मिळण्याचे अमिष दाखवित त्यांना ३२ लाख रुपयात ऑनलाईन गंडविले. ही घटना दि. १३ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सायबर ठगांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कांचन नगरात विलास चौकात मोहन रघुनाथ सपकाळे हे वास्तव्या असून ते नोकरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. दि. २७ फेब्रुवारी ते दि. ११ एप्रिल रोजी पर्यंत श्वेता शेट्टी नावाच्या तरुणीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन मॅसेज आला. त्यामध्ये केएसएल ग्रुपमध्ये अॅडमीन अमोल आठवले अशा इसमांनी त्यांना नंबर अॅड केला. त्यानंतर मोहन सपकाळे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांना केएस मीन अॅप डाऊनलोड करायला सांगून त्यावर रजिस्ट्रेशन देखील करायला लावले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सपकाळे यांनी रजिस्ट्रेशन करुन त्यांनी अधिक नफा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केली.
डाऊनडोल केलेल्या अॅप्लिकेशनद्वारे शेअर्स खरेदी केल्यानंतर केएस मीन या अॅप्लिकेशनवरील सपकाळे यांच्या खात्यावर आभासी नफा दाखविला. तसेच त्याद्वारे त्याच्याकडून वेळोवेळी सुमारे ३२ लाख २४ हजार ९९९ रुपयांची रोकड ऑनलाईन स्विकारली. त्यामुळे सपकाळे यांना शेअर्स खरेदी करणे चांगलेच महागात पडले. फसवणुक झाल्याने दिली पोलीसात तक्रार सुमारे ३२ लाखांची रक्कम ऑनलाईन स्विकारल्यानंतर त्याचा परतावा म्हणून १५ हार रुपये देण्यात आला. परंतु उर्वरीत रक्कम परत मिळत नसल्याने सपकाळे यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संपर्क करणाऱ्या श्वेता शेट्टी, अमोल आठवले नामक व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणयात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.