मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीने गुरुवारी शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्या घरांवर छापा टाकला. एनसीबीने अनन्याला चौकशीसाठी बोलावले होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास ती एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर अनन्या संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास एनसीबीच्या ऑफिसमधून बाहेर पडली. उद्या पुन्हा एकदा अनन्याला सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.
गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. “संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाते.
२२ वर्षीय अनन्यानं २०१९ साली बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून अनन्या स्टार सर्कलमध्ये वावरू लागली आहे. २ ऑक्टोबरला कार्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यामध्ये एनसीबीनं अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. त्या संदर्भात तिची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.