TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्…पिडीतेने मांडली कोर्टात स्वतःची बाजू…न्यायालयाने फेटाळला आरोपीचा जामीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आरोपीला जामीन मिळू नये? तसेच तिच्यावर आरोपी पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर व्यथित झालेल्या लैंगिक अत्याचार पिडीत महिलेने कोर्टात स्वत: भक्कमपणे बाजू मांडल्याची दुर्मिळ घटना आज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात घडली. विशेष म्हणजे न्यायालयात पिडीत महिलेने आरोपी पक्षाचे सर्व आरोप लेखी व तोंडी स्वरुपात मुद्देसूद खोडून काढले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

या संदर्भात अधिक असे की, स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सीताराम शर्मा (रा. मुंबई) याने कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय महिलेवर सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केला. महिलेचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षे अत्याचार करीत राहिला. याप्रकरणी १५ फेब्रुवारीला शर्मा विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अत्याचार व अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टात आरोपी पक्षाच्या वकिलांनी फिर्याद खोटी असून संबधित महिला खंडणी मागत असल्याचे म्हटले. त्यावर पिडीत महिलेने आपला खुलासा स्वतः सादर करण्याची परवानगी जिल्हा न्यायाधीश न्या. श.ग. ठुबे यांच्याकडे मागितली. त्यावर न्यायालयाने पिडीत महिलेस परवानगी दिली. त्यानंतर पिडीतेने आपल्यावरील आरोप खोडून काढायला सुरुवात केली.

 

पिडीतेने म्हटले की, ज्याअर्थी अशोक शर्मा यांच्या वकिलांनी अर्जात नमूद केले आहे की, त्यांनी माझ्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्थानकात २४ नोव्हेंबर २०२० ला खंडणीचा अर्ज दिला आहे. तर त्या अर्जावर फायलिंग क्रमांक का नाही? किंवा मला गेल्या तीन महिन्यापासून अर्जाच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आले नाही?, सदर अर्जाचा फायलिंग नंबर आणि अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांची डिटेल व तसेच ३५ म्हणजे काय? लाख, हजार, रुपये की पैसे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 

आरोपीकडे माझे अशील फोटो व्हायरल करण्याची आणि वेळोवेळी आत्महत्येची धमकी देत मानसिक शारीरिक व भावनिक दबाव तंत्राचा वापर करून माझी इच्छा नसताना शरीरसंबंध प्रस्थापित केले आहेत. अशोक शर्माने अज्ञात व्यक्ती मार्फत माझ्या नवऱ्याला पत्र पाठवून माझ्याविषयी भडकाविले. शर्माने गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी जळगाव शिव कॉलनी एसबीआय शाखा नाशिक येथे लॉजिंगमध्ये तसेच मुंबईला माझ्यावर शारीरिक अत्याचार मानसिक छळ केलेला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ब्लॅकमेलिंग करून मला फारकत घेण्यास भाग पाडले.

 

अशोक शर्मा उच्चशिक्षीत असून एसबीआय शाखा व्यवस्थापक आहेत. त्यामुळे माझ्यावरील ब्लॅक मॅजिक आणि करणी कवटाळ करण्याचा आरोप एक कल्पक अकल्पित घटना त्यांनी कोर्टासमोर मांडली आहे. अशोक शर्माने व्हिडिओ कॉल मार्फत पैसे दिले म्हणणे आहे. परंतु ते पैसे कसे दिले जातात?, हे त्यांनी स्पष्ट करावे. पोलिसातील माझ्या विरोधातील तक्रार अर्ज सोबत कोणताही इनवर्ड नंबर नाही. पोलीस स्टेशनला अर्ज दिल्याची सत्यप्रत नाही. त्यामुळे बलात्कार झाल्याचे खोटे असल्यास त्यांनी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात दाखल करावेत, असे देखील पिडीत महिलेने कोर्टात सांगितले.

 

पिडीत महिला पुढे म्हणाली शर्मा यांनी बलात्काराबाबत कुणाला सांगितल्यास आत्महत्या करेल तसेच तुझ्यामागे गुंड लावेल. पोलिसांना आणि वकिलांना पैसे देईल, त्यांच्या या दबावामुळेच पतीसोबत कायदेशीर फारकत घेतली. मी अशोक शर्मा यांच्याकडे कोणतीही खंडणी मागितली नाही. माझ्याकडे घरभाडे भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मी त्यांच्याकडून फोनवर घर भाडे मागितले आहे. याबाबतचे सर्व पुरावे मी जोडत आहे. तसेच सचिन सोबत बोलण्याची ऑडिओ रेकॉर्डिंग पण देत आहे.

 

अशोक सर्वांनी जे काही माझ्याविरुद्ध मांडण्याचा प्रयत्न केला ते खोटे असून शर्माकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्याचप्रमाणे आरोपीला जामीन मिळाल्यानंतर ते मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची बेतात आहे. त्याच्यामुळे माझे सामाजिक स्तरावर अपमान होत आहे. तसेच शर्मा याचा मित्र दुर्गादास (पूर्ण नाव माहित नाही) यानेदेखील पीडित महिलेच्या संदर्भात एका अॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या दोघांकडे पीडित महिलेचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आहेत. त्यामुळे दुर्गादास पोलीस स्टेशन किंवा कोर्टासमोर हजर होत नाही. तोपर्यत अशोक शर्माला जामीन मिळू नये, असे पिडीतेने कोर्टात आपली बाजू मांडली. पिडीतेस सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी कायदेशीर मदत केली. दरम्यान, पिडीत महिलेने न्यायालयात स्वत: आपली बाजू मांडल्याची आजची घटना ऐतिहासिक मानली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
Next Post

चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज आढळले ८२ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिवाळी अंकाचे प्रकाशन : ग्रामगौरव नवा आयाम ठरावा

October 27, 2022

धक्कादायक : पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !

January 12, 2023

धरणगाव वाळू माफिया प्रकरण : तक्रारदार झाला आरोपी ; तहसीलदारांची खंडणीची फिर्याद !

November 4, 2020

मला पुरुष आवडतात पण सामाजिक दबावापोटी तुझ्याशी लग्न केले !

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group