नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. देशाचं सामर्थ्य वाढवण्यात सर्वांचे योगदान, या देशभरात टोल प्लाझा ही सर्वांनी स्विकारलं आहे. सर्व राज्यात टोल प्लाझा आहे. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. या दरम्यान काँग्रेस खासदार सभात्याग करत सभागृहातून बाहेर पडले. मोदींच्या भाषणादरम्यान ८ वेळा गदारोळ झाला आहे. सहाव्या वेळी झालेल्या गदारोळानंतर मोदी संतापले. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना म्हणाले की, हे जरा जास्तच होतंय, मी तुमचा आदर करतो. कृषी कायद्यांविषयी बोलताना मोदींनी पुन्हा एकदा आंदोलनजीवीचा मुद्दा छेडत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांचे आंदोलन पवित्र असल्याचे मी मानतो. पण, शेतकऱ्यांच्या या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम हे आंदोलनजीवी करत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी कृषी कायद्यांवर बोलताना म्हणाले की, ‘या कोरोना काळात ३ कृषी कायदे देखील आणले. कृषी सुधारणेची ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. वर्षानुवर्षे आपल्या शेती क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यातून सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यातील आव्हानांना देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. मी पाहत होतो की, येथे काँग्रेसच्या सहकार्यांनी चर्चा केली की ते कायद्याच्या रंगावर तो काळा आहे की पांढरा यावर वाद घालत होते. त्यांनी कंटेंटवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली असती.’
यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावेळी मध्ये मध्येच बोलायला सुरुवात केली. यावर मोदींनी भाषण थांबविले आणि खाली बसले. लोकसभा अध्यक्षांनी चौधरींना समजावल्यानंतर मोदी पुन्हा उभे राहिले. मात्र, पुन्हा बोलू लागताच चौधरींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. यावर मोदींनी तुमचे म्हणजे रजिस्टर करण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला आणखी काही बोलायचेय का असे विचारले. यावर चौधरी यांनी माईक बंद केलाय मग कसे बोलणार अशी तक्रार केली. यावर साऱ्या सभागृहात हशा पिकला. यानंतर पुन्हा मोदींनी बोलण्यास सुरुवात करताच चौधरींनी त्यांना पुन्हा थांबविण्यास सुरुवात केली. हे पाहून मोदी संतापले. अधीर रंजन जी आता अती होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला बंगालमध्ये तृणमूलपेक्षा जास्त प्रसिद्धी नक्की मिळेल, काळजी करू नका. हे चांगले दिसत नाहीय. तुम्ही असे कधी वागत नाही, आता का वागताय, असा सवाल केला. तसेच राज्यसभेत काँग्रेसचे काय वेगळेच चाललेय आणि लोकसभेत काही वेगळेच अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडविली.
यावेळी कृषी कायद्यांची बाजू मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सुरु होता. तेव्हा संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी भर लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका मोदींनी केली. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.