भुसावळ (प्रतिनिधी) दि. ७ मे 2022 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये जातीय, धार्मिक सलोखा कायम राहावा, जिल्ह्यातील, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिक पोलीस दला सोबत आहे.
हा संदेश देण्याच्या उद्देशाने जातीय /धार्मिक सलोखा जपण्यासाठी आपली सही/ संदेश ह्या मोहिमेत भुसावळ येथील आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष मयूर अंजाळेकर यांनी सुद्धा सहभाग नोंदवून सर्व धर्म समभाव चा संदेश देऊन आम्ही भुसावळकर एक आहोत आणि कोणत्याही कारणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधवा मध्ये द्वेष निर्माण होणार नाहीत हा संदेश दिला. तसेच जळगाव जिल्हाचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांचे आभार मानले की ही अतिशय सुंदर अशी संकल्पना त्यांनी उभी केली तसेच भुसावळ मध्ये कायदा व सुव्यवस्था भंग नाही होऊ दिले. त्याबद्द्ल तालुका उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांचे सुद्धा पत्राद्वारे अभिनंदन व आभार मानले आहे.