जळगाव (प्रतिनिधी) भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “छत्रपती संभाजी राजे शिक्षणशास्त्र “महाविद्यालयाचे व्दितीय वर्षाच्या विदयार्थीनींनी त्यांच्या आंतरवासिता या काळामध्ये अभिनव विद्यालय या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक सरोज तिवारी यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना सावितीमाई यांच्या महान कार्याबद्दल माहीती सांगितली. तसेचले लक्ष्मी इंघाटे, अंकिता सुरवाडे, वंती धानका, पल्लवी मनोरे, वर्षा काळे, आदिती मोरे संजीवनी तायडे माळी तेजस्वीनी यांनी सुद्धा माता सावितीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण केली.
















