औरंगाबाद (वृत्तसंस्था) मावस भावानेच बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) करून दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. इतकेच नव्हे तर ती गर्भवती राहिल्यानंतर मुलीला मारून टाकीन अशी धमकी देत गर्भपात करण्यात भाग पाडून पाच लाख रुपये लाटले.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मावस बहीण भाऊ आहेत. फिर्यादी महिलेचा काही दिवसाच्या अगोदर घटस्फोट झाला होता. या खचलेल्या महिलेला आरोपी महिलेचा मावसभाऊ याने तुझ्याशी लग्न करेन, आयुष्यभर तुझ्या मुलीचा सांभाळ करेल, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या आईचे दागिने वेळोवेळी मोडून ५ लाख रुपये घेऊन जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात त्याच्या भोईवाडा येथील रूमवर तसेच समर्थ नगर येथील एका हॉटेलमध्ये नेवून फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात ऑक्टोंबर २०२१ मध्ये फिर्यादीस गर्भधारणा झाली.
त्यावेळेस आरोपीने लग्न होईपर्यंत गर्भधारणा करू नकोस म्हणून गोळ्या घेऊन गर्भपात केला. त्यानंतर तू जर हे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलीला जीवे मारेल आणि तुझ्या सोबत लग्न करणार नाही. अशी धमकी देऊन लग्नास टाळाटाळ केली. फिर्यादी महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.