पारोळा (प्रतिनिधी) एकाने आपल्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले. एवढेच नव्हे तर, या कृत्याचे चित्रीकरण करून व्हायरल केले. तसेच व्हाटसअँपला स्टेटस पण ठेवले. याप्रकरणी विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत पत्नीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या पतीने दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी ते २६ फेब्रुवारी २०२२ दरम्यान, जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. पिडीतेची बदनामी व्हावी या उद्देशाने अनैसर्गिक कृत्याचे त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हायरल केले. तसेच व्हाटसअँप नंबरवर स्टेटस देखील ठेवले. दरम्यान, पिडीतेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.संतोष भडारे हे करीत आहे.