पुणे (वृत्तसंस्था) काकानेच पुतणी, पुतण्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून ३० वर्षीय नराधम काकाला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी वडकी येथे राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. ही महिला भंगार गोळा करून उपजीविका करत होती. या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा (वय ८) व मुलगी (वय ४) आहे. ती दुसऱ्या पतीबरोबर गेल्या ५ महिन्यांपासून राहते. गेल्या ४ महिन्यांपासून तिचा दुसरा पती निघून गेला आहे. एकेदिवशी दिवस भरल्याने तिने मुलांना शेजाऱ्यांकडे सोपवून ससून रुग्णालयात गेली. २३ मे रोजी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. घरी आल्यावर धाकटा दीर मुलांना घेऊन त्याच्या घरी गेल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी तीन पिंपळमळा येथून मुलांना घेऊन घरी आली. मुलांच्या अंगावर वळ दिसले. याबाबत विचारल्यावर दिराने उडवाउडवीची उत्तरे दिली. दुसऱ्या दिवशी मुलांना आंघोळ घालताना मुलीबाबत काहीतरी वाईट घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चौकशी केल्यावर छोट्या काकाने अत्याचार केल्याचे चार वर्षांच्या मुलीने सांगून त्याचा खूप त्रास होत असल्याचे सांगितले. मुलाचीही तीच अवस्था होती. त्याच्यावर काकाने अनैसर्गिक अत्याचार केला होता.