TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : ११ वर्षीय मुलाला दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं, मुलगा वागू लागला श्वाना सारखाच ; घटना वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना पुण्यातल्या कोंढवा (Kondhwa) परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये घडली आहे. कोंढवा पोलिसांनी पीडित मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनमधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणं खरोखर कठीण काम होतं. कारण ती सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती. घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल 22 कुत्र्यांच्या सान्निध्यात हा 11 वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे. मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये कुत्र्याची 22 पिल्लंदेखील होती. कित्येक दिवसांपासून हा पीडित लहान मुलगा कुत्र्यांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ही गोष्ट सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात अल्यानंतर त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला आणि त्यांना मुलाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली.

या तक्रारीवर कारवाई करून फाउंडेशनशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. मुलाच्या आई-वडिलांची तोंडी कानउघडणी करून समाजसेवक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा ते संबंधित घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसलं. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचं आढळलं. त्यानंतर बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली होती.

या भीषण घटनेबद्दल माहिती देताना ज्ञान देवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे यांनी ‘पुणे मिरर’ला सांगितलं की, ‘घरातून रेस्क्यू केलेलं मूल कुत्र्यासारखं वागत असल्याचं पाहून आम्हाला धक्का बसला. कित्येक दिवसांपासून योग्य पोषण न मिळाल्यानं तो मुलगा अशक्त झाला आहे आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. त्याचे आई-वडील घरी जेवण बनवत नव्हते. त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर किंवा इतर कोणतीही व्यवस्था नव्हती.

ते बाहेरून जेवण ऑर्डर करत होते. या जोडप्याचा व्यवसाय होता; पण तो बंद झाला आहे. तेव्हापासून हे दोघे बेरोजगार आहेत. घरामध्ये स्वच्छतेचा प्रचंड अभाव होता. जेवणाचे रॅपरसुद्धा घरामध्येच पडलेले होते. सर्वात वाईट म्हणजे कुत्र्यांनी घरामध्ये ठिकठिकाणी मलमूत्र विसर्जन केलेलं होतं. घरातली दोन कुत्री मेली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुलाला आंघोळही घातलेली नव्हती. त्यामुळे सोसायटी व परिसरात दुर्गंधी पसरली होती. या जोडप्यानं आपल्या मुलाला कुत्र्यांसह घरात कोंडून ठेवलं होतं. त्यामुळे तो आता कुत्र्यांसारखं वागू लागला आहे.’

‘शाळा सुरू झाल्यानंतर या मुलाला शाळेत पाठवलं गेलं होतं; पण तो कुत्र्यासारखं वागू लागला आणि इतर मुलांना चावू लागला. त्यामुळे पालकांनी त्याला शाळेत पाठवणं बंद करून घरात डांबून ठेवलं होतं. त्यांनी त्याला बाहेर काढलं नाही. जेव्हा त्याला रेस्क्यू करण्यात आलं, तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या आकाशाकडे आणि इतर गोष्टींकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता. एकंदरीत तो आपली ओळखही विसरला असल्याचं निदर्शनास आलं. आम्ही त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे,’ असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं.

सध्या हा मुलगा कुत्र्यासारखा वागतो आहे. म्हणून त्याला योग्य समुपदेशनाची गरज आहे. मुलाला सांभाळण्यास सक्षम नसलेल्या पालकांकडे आम्ही मुलाला परत देऊ शकत नाही, असं अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितलं आहे. ही घटना फारच धक्कादायक असून, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. लहान मुलांना प्राण्यांच्या सान्निध्यात कोंडून ठेवणं आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होणं, हा एक प्रकारचा गुन्हा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

चोपडा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण

May 8, 2021

सीआरएमएस कार्यालयात ध्वजारोहण

January 27, 2022

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तुम्ही पाहिलंत का? (व्हीडीओ)

September 3, 2021

धरणगावात कॉंग्रेसची कृषी विधेयका विरोधात स्वाक्षरी मोहीम ; आजी-माजी पालकमंत्र्यांची उपस्थिती

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group