धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन मार्फत विविध क्रीडा स्पर्धा रविवारी घेण्यात आल्या होत्या. यास्पर्धांमध्ये अनोरे येथील बी.जे. महाजन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
बी.जे. महाजन विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी दिनेश पुंडलिक पाटील याने भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक तर दिगंबर भिकन पाटील याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी यांच्यातर्फे दोघं गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक आर.बी.महाले, ए.के. पाटील, बी.आर.महाजन, के.ए.वारुळे, के.बी.महाजन, बी.डी. सुतार, पी.एन.माळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.