TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार पडळकर व खोत यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन…!

vijay waghmare by vijay waghmare
December 19, 2024
in धरणगाव, ब्लॉग
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने पवार साहेबांच्या बाबतीत उपमर्दकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार पडळकर व खोत यांचे फोटो असलेल्या बॅनरला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

सध्या देशात मनुस्मृती समर्थकांची संस्कृती सर्वदूर फोफावली आहे. ज्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता प्रस्थापित करण्यासाठी संविधान दिले त्यांचा जयघोष झाल्याने अनेकांना पोटशूळ उठतंय म्हणून आजचे जोडे मारो आंदोलन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून करण्यात आले. तद्नंतर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करून धरणगाव पोलीस स्टेशन येथे स.पो.नि. निलेश वाघ यांना देण्यात आले. या निवेदनात अर्जदार लक्ष्मण पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदा खोत यांनी जाहीर सभेद्वारे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शरदचंद्रजी पवार साहेब यांचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील शांतता भंग होऊन जातीय व सामाजिक तणाव निर्माण होण्याचा धोका आहे. त्यांनी जाणीवपूर्वक शरदचंद्रजी पवार यांचेविरुध्द अपमानास्पद व अर्वाच्च्य भाषेचा वापर केला असून समाजामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. ही कृती महाराष्ट्राच्या शांतताप्रिय व प्रगतशील संस्कृतीस विरोध करणारी असून समाजामध्ये असंतोष निर्माण करण्याचे कट कारस्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून हेतुपुरस्सर पवार साहेबांबद्दल अर्वाच्च्य भाषा वापरली जाते व चारित्र्यहनन केले जाते, तरी याचा कायदेशिर बंदोबस्त झाला पाहिजे. त्यामुळे त्यांचेविरुध्द खालील भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. यात कलम – (१९२) समाजामध्ये तेढ निर्माण करणे, कलम (३५२) जाणून-बुजून शांतताभंग होईल असे कृत्य करणे, कलम (५९ व ६१- अ) गुन्हेगारी स्वरुपाचे षडयंत्र रचणे; अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धरणगाव तालुका व शहर यांनी केली आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

या निषेध आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोनवदचे बाळासाहेब पाटील, उज्वल पाटील, रविंद्र पाटील, उत्तम भदाणे, बापू मोरे, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, रा.काँ.अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नईम काझी, अमित शिंदे, प्रा.आर.एन.भदाणे, अनिल पाटील, अमोल हरपे, हितेंद्र पाटील, तसेच शहरातील खलील खान, रमेश महाजन, रविंद्र महाजन, राजेंद्र गायकवाड सर, राजेंद्र सोनवणे, महेंद्र पाटील, सागर महाले, सागर महाजन, गोपाल महाजन, विक्रम पाटील, अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, जुनेद बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanJoin the poster of MLA Padalkar and Khot on behalf of the Nationalist Sharad Pawar group and protest...!

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य- रविवार ६ ऑक्टोबर ते शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ !

October 6, 2024

स्वस्तधान्य दुकानात चक्क चालतोय जुगारअड्डा; राष्ट्रवादीचे कारवाईसाठी निवेदन

September 11, 2020

दोघांचा गळा कापून खून, सुरतचे दोन ‘सुपारी किलर’ जळगाव एलसीबीच्या जाळ्यात !

June 28, 2024

अमळनेरात शिवधर्म पध्दतीने साजरे केले लक्ष्मीपूजन !

October 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group