नवी दिल्ली (वृत्तसंस्था) करोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून दोन वेळा मदत जाहीर केली आहे. दिवाळी अगोदर गरीब लोकांना मदत व्हावी याकरिता आणखी एक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीच्या पॅकेजमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकण्यात आले होते. दिवाळीच्या अगोदर या महिलांच्या खात्यामध्ये आणखी दीड हजार रुपयांची रक्कम तीन तीन टप्प्यात टाकली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या पॅकेजनुसार नोव्हेंबर महिन्यापर्यंत कमी दरावर अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याचा उपयोग 80 कोटी लोकांना होत आहे.