नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाथरस येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
यावेळी महाविद्यालयात नागरी सेवा २०२० ची परीक्षा सुरू होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. कॉलेजची दहा ते बारा मुलं जबरदस्तीने मला कॉलेजच्या आवारात घेऊन गेली. त्यांच्यापैकी एकाने माझा विनयभंग केला. दुसऱ्या मुलांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. माझ्याकडे असलेले दोन हजार रुपयेही काढून घेतले. मी ज्या मुलाला भेटायला गेली होती, त्याला सुद्धा या मुलांनी मारहाण केली असा आरोप पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत केला आहे. या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यात केली, तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मला या मुलांनी दिली, असा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या प्रकरणात दोन मुख्य आरोपींसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे, असे झासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आणखी काही जणांची नावे समोर आली, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असे दिनेश कुमार यांनी सांगितले.