जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणेसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेमार्फत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी दिव्यांग व्यक्तीनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद विजय रायसिंग यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण घेणेसाठी http://forms.gle/२Sf७Rtd५ByVn२GVx६ या लिंकवर दिव्यांग व्यक्तीची नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी करण्याची अखेरची तारीख २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यत आहे. तरी दिव्यांग व्यक्तीनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद विजय रायसिंग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.