जळगाव (प्रतिनिधी) प्रदेश अध्यक्ष मोहम्मद पठाण व प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब (उत्तर महाराष्ट्र व विदर्भ प्रमुख) यांच्या संयुक्त नियुक्ती पत्राद्वारे मजहर पठाण यांची राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नियुक्ती पत्र देताना जावेद हबीब व एजाज अब्दुल गफ्फार मलिक, पाशा भाई नागपूर, शोएब खान भुसावळ शहर अध्यक्ष, शकिर भाई जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते.