TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार शिरीषदादा चौधरी यांनी घेतला महा कृषी ऊर्जा अभियानात सहभाग

दोन कृषिपंपांच्या ९५ हजारांच्या वीजबिलांचा भरणा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2021
in जळगाव, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे ९५ हजार रुपयांचे वीजबिल गुरुवारी (८ एप्रिल) भरले. कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.

या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारित थकबाकीपैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांनीही या अभियानात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या खिरोदा व कुंभारखेडा येथील दोन कृषिपंपांचे एक लाख ५६ हजार ४८० रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ 95 हजार रुपये भरावे लागले आहेत. या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. केवळ बिलात सवलतच नव्हे तर कृषिपंपांना लागणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधा विकसित करणारे हे अभियान आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार श्री.शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला मोठा धक्का : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळमधील मोबाईल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

January 5, 2023

काँग्रेसच्या ९९ खासदारांना अपात्र ठरविण्याची याचिका !

August 11, 2024

जिल्ह्यातील दिव्यांगासाठी १० ऑगस्टला भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर!

August 3, 2022

शहीद जवान अमोल देवरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group