जळगाव (प्रतिनिधी) यावल येथील रहिवासी व मनसे चे निष्ठावंत सैनिक संजय नन्नवरे यांची रावेर व चोपडा विधानसभेच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेचे निरीक्षक व राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे (मुंबई) यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष कमलाकर घारु, यावल तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहर अध्यक्ष आकाश चोपडे उपस्थित होते.
दरम्यान विनय भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली व पक्ष बांधणी, आगामी निवडणुका या बाबत आढावा घेण्यात आला.