TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन !

नॅशनल एज्युकेशन शिक्षण प्रणालीवर आधारीत खेळ, मनोरंजनातून हडप्पा संस्कृतीचे दर्शन !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून डॉ. इंद्राणी मिश्रा असतील. सोबत जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतूल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन उपस्थितीत असतील. ९, १०, ११ फेब्रुवारी असे तीन दिवस खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४.३० ते ८.३० वाजेदरम्यान मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा संस्कृतीचे ऐतिहासिक दर्शन हे एड्युफेअरचे आकर्षण असेल.

‘खेळता खेळता शिका व शिकता शिकता खेळा’ ह्या संकल्पनेवर आधारित एड्युफेअरमध्ये १४ झोन असून ८० पेक्षा जास्त खेळ अनुभवता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चार वयोगटानुसार खेळांची विभागणी केली आहे. यामध्ये भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या इंग्रजी, हिंदी, मराठी मध्ये अनेक खेळ आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वीतेवर विज्ञान झोन, नासा, रशियाच्या स्पेस कार्यावर अनेक वर्किंग मॉडेल असतील, यातून प्रत्यक्ष इस्रो मध्ये असल्याची अनुभूती होईल. गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती व सृजनशिलतेला चालना देणारे कोडींग मॉडेल उभारले आहे.

READ ALSO

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

मनोरंजनात्मक एड्युफेअर…!
मनोरंजनातून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकलेचा आविष्कार पाहता येणार आहे. यात पपेट शो, नृत्य, संगीत, तबला, लाठी-काठी नृत्य, बासरी, चार्ली चैपलिन यासह विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनविलेल्या हस्तकलेच्या २००० पेक्षा जास्त वस्तूंचे प्रदर्शन बघता येईल. अॅडव्हेंचर गेम झोनमध्ये जे पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे विटी दांडू, तीन प्रकारची मांडोळी, गोट्या, लाकडी व प्लास्टिक भवरा, लगोरी, पावसाळ्यातील चिखलात खेळला जाणारा खुपसनी या खेळासोबतच हॉकी, ड्रॉफ्ट द बॉल, बिन बॅग, जिम बॉ थ्रो रिंग टॉस असे शारीरिक व्यायामासोबतच आनंद देणारी खेळसुद्धा एड्युफेअर मध्ये खेळता येतील.

चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्ली…!
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांनी व्यावसायाभिमूख शिक्षणप्रणालीवर आधारित शिक्षणव्यवस्था तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते, त्या कलागुणांना हेरून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या एड्यूफेअरचे आयोजन मोठ्याभाऊंच्या प्रेरणेतून करण्यात आले आहे. यात चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्लीत पालकांसोबत विद्यार्थ्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्वत:चे स्टॉल असतील यावर ताव मारण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध करून दिली आहे.

सिंधू संस्कृतीचे दर्शन…!
एड्युफेअरचे मुख्य आकर्षण असलेले सिंधू संस्कृतीचे दर्शन होणार आहे. अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: सिंधू संस्कृतीची नगररचना केली. हडप्पा संस्कृतीची नगररचना आणि स्थापत्य, घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, धान्याची कोठारे आदी हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पनांचे २०० च्या वर मॉडेल विद्यार्थ्यांनी साकार केले आहे. आतापर्यंत फक्त पुस्तकामध्ये हडप्पा संस्कृती वाचली असेल मात्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सृजनशीलतेला चालना देणारे भन्नाट कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी एड्युफेअरमध्ये यावे, असे आवाहन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे. यातील काही निवडक खेळ सशुल्क असतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026
क्रीडा

अनुभूती बालनिकेतन व माणुसकी सेवा फाउंडेशनतर्फे बालदिनानिमित्त बालकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!

October 30, 2026
जळगाव

पाळधीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन; ४०० हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

October 30, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 9 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयात कुठेही कमी पडलेलो नाही – मुख्यमंत्री

September 13, 2020

माथेफिरुने मध्यरात्री जाळल्या दोन कार

October 19, 2022

जळगाव शहर महानगरपालिका तर्फे मतदान जनजागृती साठी SVEEP अंतर्गत *रिल मेकिंग* स्पर्धेचे आयोजन.

November 7, 2024

टोल प्लाझाच्या निषेधार्थ मनसे व टोल प्लाझा कामगारांचे काम बंद आंदोलन

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group