TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दागिने हिसकावून जिवे ठार मारण्याची धमकी ; जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दीक्षितवाडी येथील पियूष नरेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या आईला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या काकांसह ९ जणांनी मारहाण करीत १२ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि बँकेचे कागदपत्र हिसकविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आज (बुधवार) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही काकांना अटक केली आहे. त्यांना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

दीक्षितवाडी भागात माजी नगरसेवक स्व.नरेंद्र भास्करराव पाटील यांचे घर आहे. घरातील पहिल्या माळ्यावर त्यांचा मुलगा पियूष नरेंद्र पाटील हा आई ज्योती यांच्यासह राहतो. तर घराच्या तळ मजल्यावर काका विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील हे राहतात. पियुष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील असे त्यांना तीन काका आहेत. वडील स्व. नरेंद्र भास्करराव पाटील यांचे जळगाव पिपल्स बँक, दाणाबाजार शाखा जळगाव येथे सुमारे 25 वर्षापासुन त्यांच्याच नावाने वैयक्तिक लॉकर होते. सदर लॉकरमध्ये वडिलांनी त्यांच्या वैयक्तिक व आईला लग्नात मिळालेले सोन्याचे दागिने ठेवलेले होते. वडिलांनी जळगाव पिपल्स बँकचे लॉकर क्रमांक A-585 हे घेतले तेव्हा वारस नोंद केलेली नव्हती. दि. 29 जुलै 2018 रोजी वडिल मयत झाल्यामुळे बँकचे लॉकर बरेच दिवस वापरण्यात आले नसल्यामुळे जळगाव पिपल्स बँक, दाणाबाजर शाखेने लॉकर बाबत दैनिक वर्तमान पत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर नोटीस वाचल्यानंतर मी, माझी आई व माझी अशांची जिल्हा न्यायालयातुन वारस नोंद केली. त्यानंतर बँकेच्या वारस नोंदकरीता लागणा-या आवश्यक त्या कागदपत्र व कायदेशीर बाबीची पुर्तता करून आम्ही सदर कागदपत्रे जळगाव पिपल्स बँक दाणाबाजार शाखा येथे सादर केले. त्यानंतर बँकेने त्यांची नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आई ज्योती नरेंद्र पाटील व बहीण यांना लॉकर उघडण्याची परवानगी मंजुर केली. आमच्यापैकी नोंदणीकृत तीन वारसांपैकी एकाने लॉकर उघडण्यासाठी येतेवेळी उर्वरीत दोन वारसांची संमती आणावी, असे माझे काका संजय भास्कर पाटील यांना कळविले होते. त्यानंतर दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास काका संजय भास्कर पाटील यांनी समक्ष सांगीतले की, लॉकरमधील ठेवलेले दागिने घेऊन येऊ असे सांगीतले.

यानंतर काका संजय भास्कर पाटील यांना सांगितले की, लॉकर मधील दागिने काढून लगेच याच शाखेत आईच्या नावाने लॉकर घेवुन पुन्हा लॉकरमधे सुरक्षितेकरीता ठेवुन देवु. त्यावेळी काका संजय पाटील म्हणाले की, ही शाखा आपल्या घरापासून लांब असून आपण याच बँकेच्या गणेशवाडी शाखेत तेथे दागिने सुरक्षिततेकरीता ठेऊ. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन गणेशवाडी बँकेच्या शाखेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी तयार झालो. लॉकरमध्ये 12 लाख 40 हजार रुपये तसेच आजोबा शंकर जगत पाटील यांचे मृत्युपत्र व स्टॅम्प होते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी काका संजय भास्कर पाटील, विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे यांच्यासह इतर सगळे घरात हजर होते. त्यावेळी काका विजय भास्कर पाटील याने हातातून सोन्याचे दागिने व बँकेचे कागदपत्र असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावुन घेतली. तसेच शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.

यावेळी आई काकाच्या घरात आल्यानंतर यश चौधरी याने घराचे मेन गेट बंद केले. त्यानंतर संजय पाटील, विजय पाटील, मनोज पाटील, सुहास चौधरी, यश चौधरी, सारंग चौधरी, यांनी खाली पाडून आई समोर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तर मनोज पाटील याने विजय पाटील याच्या सांगण्यावरुन आपल्याकडून जबरदस्तीने हिसकावलेली सोन्याच्या दागिन्यांची व बँकेचे कागदपत्र असलेली बॅग घरातील कपाटात ठेवली. त्यानंतर विजय पाटील याने यश चौधरी याला आम्हाला बाहेर काढून द्यायला सांगीतले. यानंतर वेळोवेळी दागिने व कागदपत्र परत मागितले. परंतू परत न मिळाल्याने पोलिसात तक्रार देत असल्याचे पियुष पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, तिन्ही काकांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २७ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू, ते काय आम्हाला शिकवणार? : गुलाबराव पाटील

March 13, 2022

मनूर बु।। सहकारी दूध संस्थेला उत्कृष्ट कामकाजात तालुक्यात प्रथम क्रमांक !

September 8, 2024

कुसुंबा येथील विमानतळ परिसरात मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील चार वाहनाचा अपघात

August 13, 2024

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

February 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group