चाळीसगाव (प्रतिनिधी) चालक आणि प्रवाशांमधील वादामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या अपघातात खासगी बस उलटून १२ प्रवासी जखमी झाले. मंगळवारी (दि. २८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
चाळीसगावातून अहमदाबाद कडून छत्रपती संभाजीनगरकडे (जीजे ०१ ईटभ ९९०६) क्रमांकाची एच. के ट्रॅव्हल्सची बस जाण्यासाठी निघाली. मेहूणबारे गावाजवळील गिरणा पुलाजवळ असताना प्रवासामध्ये सोबतचे प्रवासी व ड्राइव्हर यांच्या मोबाईल चार्जिग पॉईंट बंद असलेला चालु करा या विषयावरुन वाद चालू होता व ते प्रवाशी गाडी थांबवण्याबाबत सांगत होते. पण चालक गाडी थांबवण्यास तयार नव्हते. प्रवाशी हे चालक जवळ जाऊन त्यांना विनंती करत होते व वाद ही घालत होते. सदरच्या वादामुळे अचानक गाडी रोडाच्या खाली जाउन पलटी झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सहा निरीक्षक रूपाली पाटील, पोलिस उपनिरीक्षक अशोक चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु करीत जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
चाळीसगाजवळील औट्रम घाटात चालकाचे नियंत्रन सुटल्यामुळे कार दरीत कोसळून चार जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना पुन्हा चालकाचे नियंत्रण सुटल्यामूळे बस उलटून अपघात झाला. मात्र यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघाग्रस्त बस बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी शेख जावेद शेख जमील (वय ३७ धंदा, रा. संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून (जीजे ०१ ईटभ ९९०६ वरील चालक नाव गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स. फौजदार शामकांत सोनवणे हे करीत आहेत.