जळगाव (प्रतिनिधी) तालुका पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात दोन घरफोड्यांकडून सुमारे १० लाख रुपय किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याची माहिती आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी दिली. तसेच घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आदी यावेळी उपस्थित होते. ४ डिसेंबर २०२० रोजी नंदगाव तालुका जळगाव येथे फिर्यादी शरद भास्कर धनगर रा.नंदगाव तालुका जळगाव यांचे घराचे दरवाज्याचे समोरील ओटयाखाली ठेवलेली चावीने घराचे कुलुप उघडुन प्रवेश करुन घरातील किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉकर तोडुन सोन्याचे दागीने रुपये २५ हजाराचे व २५ हजार रुपये रोख असे घरफोडी करुन चोरुन नेले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाल्यानुसार जिल्ह्यात अट्टल घरफोडी करणारे आरोपी १) दोख नाजीम शेख रशीद व २ ) शेख अरबाज शेख महेमुद हे अजिंठा चौफुली येथे येणार आहेत. अशी खबर मिळाल्यावरून त्यांना सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.१९९/२०२० भादवि.क.३८०,४५४ हा गुन्हया केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयातील मुद्देमाल हा त्याचे मित्राकडे दिला होता. तो हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पथके स्थापन करणे बाबत सुचना वा मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ. रवि नरवाडे, राजेश मेंढे,सुनिल दामोदरे, संजय हिवरकर, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, जयंत चौघरी, किरण चौधरी, परेश महाजन तसेच सहायक फौजदार – इंद्रीस पठाण, राजेंद्र पवार यांना रवाना केले होते.
दोन्ही आरोपींची जळगाव जिल्ह्यात अनेक घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शेख नाजीम शेख रशिद वय -२८ वर्षे रा,मलिक नगर,जळगाव २) शेख अरबाज शेख महेमुद दय २० रा.अक्सानगर जळगाव यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार पोहेकॉ. रवि नरवाडे हे तपास करीत आहेत.