धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक परमेश्वर रोकडे हे नेहमी आपल्या चित्रांच्या माध्यमातून तथा कलेवर लिखाण करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक जागृतीचं व समाज प्रबोधनाचं काम करत आहेत.
गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचं कोरोना महामारीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे आणि आता नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. सर्व विद्यार्थी आनंदाने शाळेत जायला लागले. त्यात पुन्हा ओमायक्रॉन हा नवीन व्हायरस आल्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु आपला विद्यार्थी हा सुरक्षितपणे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये अगदी आनंदाने शिक्षण घेत आहे.
कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांनी या चित्राच्या माध्यमातून हे दर्शवलेलं आहे की, विद्यार्थी सुरक्षित आहे आणि आनंदाने शिक्षण घेत आहे. कलाशिक्षक रोकडे हे नेहमी आपल्या चित्राच्या माध्यमातून पाणी वाचवा, लोकसंख्या, साक्षरता, भूकंप, शिक्षणाविषयी जागरूकता, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त अशा अनेक विषयांवर भीतीचित्र साकारून समाजामध्ये एक प्रबोधनाचं काम करीत असतात. याच अनुषंगाने आजच्या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून आनंदाने शिक्षण घ्यावे. असा संदेश दिलेला आहे.