नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हमीरपूरमध्ये एका लग्न समारंभात जयमाला कार्यक्रमादरम्यान नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हार घालताच तिचा पारा सातव्या गगनाला भिडला. हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दणादण कानाखाली दिल्यामुळे सर्वच जण अवाक् झालेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हमीरपूरच्या लालपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील स्वासा वृद्ध गावातील रहिवासी राम मनोहर वर्मा यांची धाकटी मुलगी रोशनी हिचा विवाह रविवारी पार पडला. रविवारी जालौन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामरी गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. येथे मिरवणूकीचा कार्यक्रम संपल्यानंतर वर आपल्या साथीदारांसह मंचावर पोहोचला आणि त्यानंतर नववधू हातात हार घेऊन आपल्या मैत्रिणींसह मंचावर आली. जयमालाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर वराने प्रथम वधूला पुष्पहार घातला. त्यानंतर वधूचा पारा चढला आणि तिने वराला चापट मारायला सुरुवात केली. मंचावर वरासाठी आलेला पुष्पहार फेकून नववधू संतापाने तेथून निघून गेली.
ही संपूर्ण घटना जयमालाचा व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांच्या मोबाईलमध्ये कैद झाली आहे. यानंतर लोक आणि वऱ्हाडींमध्ये वाद सुरू झाला आणि लाठ्या-काठ्यांमुळे काही जण जखमीही झाले. तिथल्या अनेकांनी मुलीला वर पसंत नसल्याचं सांगितलं. वधूने आपल्या खोलीत जाऊन लग्नास नकार दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. असे सांगितले जाते की वधूला वर पसंत नव्हता, त्यापूर्वी त्याने तिला पाहिले नव्हते. जयमालाच्या मंचावर वराला पाहून वधूला राग आला आणि रागाच्या भरात तिने वराला थप्पड मारली. एसएचओ श्रीप्रकाश यादव यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला फिट येते. मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नाही. दोन्ही बाजूंमध्ये सामंजस्य करार झाला असून पुढील विधी पूर्ण करण्यात आले आहेत. नववधूने असे कृत्य का केले? हे कोणालाच समजत नव्हते. नवरदेव रविकांत याने अगोदर नवरीला हार घातला. तेव्हा नवरीच्या लक्षात आले की, आपले होणारे पती हे दारूचे व्यसन करतात. त्यानंतर लगेच वधूने वराच्या दोन कानाखाली लगावल्याचे बोलले जात आहे.















