पातोंडा ता. अमळनेर (प्रतिनिधी) गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड़ा चौफुलीचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे.
कित्येक दिवसांपासून सावखेड़ा चौफुली येथे काटेरी झाड़े-जुड़पे व कचरा झालेला दिसत होतो. परंतु पातोंडा व परिसरातील ग्रामस्थानी सावखेड़ा चौफुलीचे सुशोभीकरण करण्याची मागणी सावर्जनिक बांधकामाकडे देखील केली होती. त्याची दखल बांधकाम विभागाने घेतली आणि डांबरीकरण केले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी विभागाचे आभार मानले आहे.
पातोंडा सावखेड़ा व परिसरातील ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी व युवक वर्ग इकडे व्यायाम करण्यासाठी येत असतात. बसण्यासाठी बाक व प्रकाशसाठी दिवे बसावेत, त्याचप्रमाणे लोक प्रतिनिधी यांच्या निधीमधून बाक व दिवे बसवून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या चौफुलीवर वाहनाची खुप वर्दळ देखील असते. तसेच पातोंडा येथील ग्रामस्थ जळगाव जाण्यासाठी याच चौफुलीचा वापर करत असतात. त्यामुळे एसटी महामंडळकडून चोपड़ा शिरपुर येथील बसला थांबा द्यावे, अशी देखील मागणी होत आहे.
तसेच येथे पोलीस चौकी देखील होती, परंतु काही कालांतराने ती बंद अव्यवस्थेतच दिसत आहे. येथील चौफुलीवरून जाणारे मार्ग व वाहनधारक मुंबई, नाशिक, पुणे, सूरत, बुऱ्हाणपूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद असे वाहन वापरत असतात. तसेच या चौफुलीवर अपघात देखील होत असतात. त्यामुळे पोलीस चौकी सुध्दा नवीन सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.