जळगाव (प्रतिनिधी) जळगाव (प्रतिनिधी) शहराला लागून असलेल्या महादेव नगर भागातील रहिवाशी संजय बाबुशेठ जैन यांच्या कुटुंबियांवर याच भागातील काही तरुणांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. तर जैन यांनी आपल्या पुरवणी जबाबात आणखी उर्वरित आरोपींची नावं सांगितली होती. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपअधीक्षक कुमार चिंता यांनी घटनस्थळाला भेट देत उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. परंतू अद्यापही संशयिताना अटक न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहराला लागून असलेल्या महादेव नगर भागातील रहिवाशी संजय जैन यांच्यासह कुटुंबियांवर शेख आवेश , गुलाब शेख, अरबाज, शाहिद, बिस्मिल्ला, आशू, गुजू, सदू यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात संजय जैन, मुलगा महावीर व मुलगी जखमी झाले होते. तर किराणा दुकानातील मालाची नासधूस करण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक कुमार चींथा यांनी घटनास्थळी भेट दिली असता जैन यांनी घटनेचे व्हिडिओ दाखविले. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी जास्त दिसत असल्याने उर्वरित आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्याचे आदेश तालुका पोलिसाना श्री.चींथा यांनी दिले होते. परंतू अद्यापही उर्वरित आरोपींना अटक न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात अनेक गंभीर घटना घडल्या असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. जैन कुटुंब ज्या ठिकाणी राहते ती वस्ती अगदी शहराच्या एका कोपऱ्यात व शेतात असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ते लवकरच पोलिस उपअधीक्षक कुमार चिंता व पोलीस अधीक्षक मुंढे यांची भेट घेणार असल्याचे समजते.
सोनावणे साहेबांसारखी कार्यतत्परता इतर अधिकारी का दाखवत नाहीय?
तालुका पोलीस स्थाकानाचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी घटना घडल्याबरोबर संशयित आरोपींना चांगलाच खाक्या दाखविला होता. तसेच पिडीत परिवाराला दवाखान्यात नेत उपचार केले. परंतू पो.नि. सोनवणे आपल्या खाजगी कामामुळे सुटीवर गेल्यानंतर मात्र, या प्रकरणाचा तपास थंडावला आहे. कारण श्री. जैन यांनी पुरवणी जबाबात दोन आरोपीनींचे नाव देऊनही अद्याप त्यांना अटक झालेली नाही.