धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथे जुन्या वादातून पिता-पुत्रास मारहाण केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
धरणगाव पोलीस स्थानकात राजाराम विठ्ठल महाजन (वय 40, रा. आनोरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनेश जगन्नाथ महाजन व महेश जगन्नाथ महाजन, मुरलीधर ज्ञानेश्वर महाजन आणि गिरीश दिनेश महाजन (सर्व रा. आनोरे ता. धरणगाव) यांनी दि.१५ जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास आनोरे शिवारातील रस्त्यावर मागील भांडणाच्या कारणावरुन राजाराम महाजन आणि त्यांचा मुलगा विनोद महाजन यांना खाली पाडुन चापटामुक्क्यानी मारहाण केली. तसेच दिनेश महाजन यांनी राजाराम महाजन यांना तुझ्याने काही एक वाकडे होणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.