मुंबई (वृत्तसंस्था) ठाण्यातील मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात बिलाल काझी आणि फैज मन्सूरी नावाचे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभेचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला. काल रात्री 8 ते 9 च्या दरम्यान ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. हल्लेखोर कोण होते हे अद्याप समजू शकले नाही. या हल्लेखोरांनी एमआयएम पक्षाच्या कार्यालयात घुसून लोखंडी रॉड, तलवारीसह धारदार शस्त्रांनी कार्यालयात बसलेल्या दोन कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तसेच, कार्यालयाचीही तोडफोड केली. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहा ते बारा अज्ञात हातात रॉड, काठ्या घेऊन कार्यालयामध्ये घुसल्याचे दिसून येत आहे.