TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जाणून घ्या...फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गणपती विसर्जनाच्या दिवशी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुर्वेश यशवंत महाजन (वय 23, रा. विठ्ठल मंदिर चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर फटाके, गुलाल फेकला. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग आल्यामुळे जमावाने थेट दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले होते. महिलांवर चाकुने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी सकाळी जमावाच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

काय म्हटलंय फिर्यादीत !
महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या जयदुर्गा भवानी क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जन करून विठ्ठल मंदिर चौकात थांबले होते. याच चौकात महापौर महाजन यांचे घर आहे. दरम्यान, यावेळी एक गाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळ असे दोन्ही मंडळ त्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक नेत होते. या मिरवणूकीतील काही तरुण महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकून मोठ्याने आरडाओरड करीत होते. एक तरुण पेटलेले फटाके महाजन यांच्या घरावर फेकत होता. या प्रकरामुळे चौकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुर्वेश महाजन यांच्यासह महेश महाजन, पुष्पक महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले.

यांच्याविरुद्ध दाखल झालाय गुन्हा
आमच्या घरात वृद्ध पेशंट आहे. त्यांचे बायपास झाले आहे. त्यामुळे तुम्ही या चौकातून पुढे जा. असे महाजन यांनी जमावाला सांगितले. याचा राग आल्यामुळे योगेश राजेंद्र नाईक, तेजस ज्ञानेश्वर वाघ, अजय संतोष सांगळे, मयुर बाळकृष्ण सांगळे, दिनेश शिवदास घुगे, किरण उर्फ उली जगदीश नाईक, तेजस उर्फ लंगड्या सुनिल घुगे, महेश शिवदास घुगे, दीपक राजेंद्र नाईक, राहुल विठ्ठल सानप, वैभव किशोर वाघ, महेश उर्फ माही लाड, रामा वासुदेव सानप, मंगेश राजेंद्र नाईक, भावेश उमेश घुगे, भरत चांगदेव आंधळे, किरण शैले, सागर विजय लाड व सोबत असलेल्या 25-30 जणांनी तुफान दगडफेक सुरू केली. काही जणांनी महिलांच्या अंगावर चाकू रोखून वार करण्याचे प्रयत्न केले.

चाकी, चारचाकींचे नुकसान, सोनसाखळी देखील लंपास
यादरम्यान अॅड. निता भरत महाजन यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी ओढून लंपास केली. दुचाकी, चारचाकींचे नुकसान केले. यानंतर गणेश मूर्ती रस्त्यावरच सोडून पळून गेले. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत जमाव पांगवला. या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Attack on the house of Mayor of jalgaon Jayashree Mahajan: Case registered against 43 people!

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

साप्ताहिक राशीभविष्य ११ ते १७ सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता रोहित पवार ईडीच्या रडारवर ; ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’कडून चौकशी सुरू !

August 27, 2022

पुण्यात खडकवासला धरणात उडी मारून तरुणानं संपवलं जीवन

January 29, 2021

संतापजनक : अल्पवयीन मुलावर महिलेकडून अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

December 2, 2023

कुटुंबियांचा लग्नाला विरोध…मध्यरात्री प्रेमीयुगल भेटल्यानंतर घडलं भयंकर ; प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group