TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साप्ताहिक राशीभविष्य ११ ते १७ सप्टेंबर २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : रागाने कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. तेव्हा घाईचे निर्णय टाळा. शांतपणे विचार करा. बाकी दिवस चांगले असतील. नोकरदारवर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष देऊ नका. व्यवसायात नवीन मालाचे उत्पादन वाढवू नका. आहे त्या मालाची विक्री करणे योग्य राहील. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा.

वृषभ : माझेच खरे करण्याच्या नादी लागलात तर मनस्ताप वाढू शकतो. हा मनस्ताप वाढवायचा की नाही हे तुमच्याच हाती असेल. तेव्हा या दिवसांत सहनशीलता वाढवणे हा पर्याय योग्य असेल. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. नोकरदारवर्गाला कामांमध्ये मागील कसर भरून काढावी लागेल. व्यवसायाला चालना मिळेल. व्यवसायासाठी काढलेले कर्ज वेळेत भरण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत उधार-उसनवारीचे व्यवहार टाळा.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : कारण नसताना हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. कोर्ट-कचेरी या गोष्टींपासून लांब राहा. नम्रता हा गुण अंगी बाणा. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदारवर्गाची धावपळ कमी होईल. समजुतीची वाटचाल राहील. दलाली व्यावसायिकांना फायद्याचे प्रमाण उत्तम राहील. वनस्पतीजन्य व्यवसायात मालाची खरेदी-विक्री करताना बाजारपेठेतील परिस्थितीचा अंदाज घ्या. आर्थिक बाबतीत रोखीच्या व्यवहाराला महत्त्व द्या. राजकीय क्षेत्रात ज्येष्ठांची कृपा राहील. व्यसनी व धूर्त मित्रांपासून लांब राहा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क : शुभ गोष्टींची सुरुवात होईल. स्वत:चे अस्तित्व स्वत: निर्माण कराल. नोकरदारवर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणे शक्य होईल. या गुंतवणुकीचा आगामी काळासाठी फायदा होईल. आर्थिक बाबतीत खर्च कमी होतील. हातून समाजसेवा घडेल. मैत्रीच्या नात्यात किरकोळ कारणावरून दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी पडतील. भावंडांचे सहकार्य मिळेल.

सिंह : व्यावहारिक गोष्टींना महत्त्व द्या. भावनिक गोष्टी टाळा. बाकी इतर दिवस चांगले असतील. नोकरदारवर्गाने पुढाकार घेऊन केलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायातून अनेक नव्या गोष्टींचा उदय होईल. त्यानुसार बदल करणे इष्ट ठरेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. समाजमाध्यमांचा वापर करताना नियमांचे पालन करा. नातेवाईकांशी संवाद साधताना वादविवाद टाळा. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.

कन्या : बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. नोकरदारवर्गाने दुसऱ्यांच्या सांगण्यावरून एखाद्या गोष्टीच्या तळाशी जाऊ नका. व्यवसायात जबाबदारीने निर्णय घ्यावे लागतील. धरसोड वृत्ती कमी करा. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. राजकीय क्षेत्रात नियमबाह्य गोष्टी टाळा. भावंडांना समजून घ्या. कौटुंबिक वाद टाळा. जोडीदाराच्या सल्ल्याने निर्णय घ्या.

तूळ : कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी समोरच्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे त्याचा त्रास आपल्यालाच होऊ शकतो. त्यापेक्षा आहे त्या स्थितीत राहणे उत्तम. नोकरदारवर्गाला कामाच्या बाबतीत इतरांच्या मदतीची अपेक्षा ठेवून चालणार नाही. व्यवसायात भागीदारी न केलेली चांगली. नवीन गुंतवणूक सध्या टाळा. आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही.

वृश्चिक : भावनिक गोष्टींचा विचार टाळा. स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिका. दुसऱ्यांच्या सांगण्याने कोणतेही पाऊल उचलू नका. शांततेच्या मार्गाने गोष्टी हाताळा. बाकी दिवस चांगले असतील. नोकरदारवर्गाने कामात असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहा. व्यवसायात नवीन उत्पन्नाचे पैलू समोर येतील. ते स्वीकारताना विचार करा. अनोळख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळा. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत दिलेला शब्द पाळा. समाजमाध्यमापासून लांब राहा. मित्रांसोबत वेळ घालवाल. मुलांची प्रगती होईल.

धनू : नोकरदारवर्गाचे काम सुरळीत चालू राहील. भागीदारी व्यावसायिकांनी हिशोबाच्या नोंदी ज्या त्या वेळी ठेवल्या पाहिजेत, अन्यथा गैरसमज वाढू शकतो. व्यवसायात आगामी काळासाठी आत्ताच गुंतवणूक करण्याची गरज नाही. आर्थिक बाबतीत नियोजनाला महत्त्व द्या. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. घरगुती वातावरण चांगले राहील.

मकर : उद्याचे काम आजच करण्याचे नियोजन करा. चांगल्या पर्वाची नांदी होईल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांकडून अपेक्षित काम मिळेल. व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. मात्र अनोळख्या व्यक्तीकडून आलेला प्रस्ताव स्वीकारू नका. स्पर्धात्मक गोष्टीत गुंतू नका. आर्थिक प्रगती होईल. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. मित्रांसोबत बोलण्यातून काही गैरसमज होतील. मात्र हे गैरसमज फार टोकाला नेऊ नका. कुटुंबातील हेवेदावे दूर होतील.

कुंभ : नोकरदारवर्गाचे कामकाजात झालेले बदल मानसिक स्वास्थ्य देणारे असेल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराटीचा कालावधी राहील. आवक-जावक मोठय़ा प्रमाणात वाढेल. ग्राहकराजा संतुष्ट होईल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवाल. राजकीय क्षेत्रात ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे अशा व्यक्तींना सल्ला देणे टाळा. नातेवाईकांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. वैवाहिक जीवनात सुख लाभेल.

मीन : नोकरदारवर्गाचे कामाचे तास कमी होतील. व्यवसायात इतरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. स्वतंत्र व्यावसायिकांना दिलासा मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवस्थापन उत्तम जमेल. सार्वजनिक क्षेत्रात सर्वागीण विकास घडेल. कुटुंबातील जबाबदारीची जाणीव होईल. वैवाहिक जीवनातील कुरबुरी दूर होतील. घरगुती वातावरण ठीक राहील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ मिळाला नाही तरी मदतीचा हात पुढे कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

जिल्हा कारागृहात चिंग्याचा पुन्हा दांगडो ; २४ तासात तुझा मर्डर करतो, सुरक्षा रक्षकाला धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंढपूर दौरा; नुकसानग्रस्त भागाची राजू शेट्टींनी केली पाहणी

October 19, 2020

तब्बल दहा वर्षांनंतर कोऱ्हाळा गावात पहिल्यांदाच पोहचली बस ; नागरिकांनी मानले रोहिणीताईंचे आभार !

September 20, 2022

जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४७३४ ने अधिक

June 3, 2021

अमळनेरातील चार रस्ते विकास प्रकल्पावर पुनर्विचार आवश्यक !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group